मुंबईमधील दादर येथे कबुतरखान्यावरील बंधीवरून वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता महानगरपालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत पालिकेने याचिका दाखल करत जो व्यक्ती कबुतरांना अन्न देईल अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे असे आदेश महापालिकेने दिले होते. यादरम्यान पालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री लावली होती.
कबुतरांना अन्न आणि पाणी देण्यावर बंदी कायम ठेवण्याबाबत आणि तज्ञांची समिती स्थापन करण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. यानंतर आज दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात कबुतर खाण्यासंदर्भात सुनावणी पार पडणार आहे. याचपार्श्वभूमिवर कबुतरखाना परिसरातील सगळी दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहेत.
याचपार्श्वभूमिवर आता कबुतरखाना बंदीच्या समर्थनाथ दादरमध्ये मराठा एकीकरण समितीने आंदोलन सुरु केलं आहे. मराठा एकीकरण समितीच्या आंदोलनात "जैन समाजाच्या आंदोलनावेळी पोलीस कुठे होते", पत्रकारांनी पोलिसांना असा प्रश्न विचारल्याबरोबर पोलिसांनी पत्रकारांशी आरेरावी केल्याच आणि धक्काबुक्की केल्याच पाहायला मिळत आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने पल्लवी पाटील यांची याचिका फेटाळून लावली आणि पुन्हा उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे कदाचित त्यावरही न्यायालय टिपणी करू शकते. ही सगळ बघणं महत्त्वाचं आहे. तसेच यामध्ये समिती गठीत होईल आणि न्यायालय देखील मुनी यांनी बोललेल्या वक्तव्यावर टिपणी करते का हे बघणे महत्वाचे ठरेल.