मोठी बातमी समोर येत आहे. रविवार दि. 2 नोहेंबर रोजीचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यानिमित्ताने रद्द करण्यात आला आहे. मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 2 नोहेंबर रोजी कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
महिला आंतरराष्ट्रीय विश्वचषक उपांत्य सामन्यापूर्वी हा मेगा ब्लॉक नियोजित करण्यात आला होता. आता सामना पाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील गाड्या रविवारीच्या वेळापत्रकानुसार चालतील. प्रवाशांनी कृपया या बदलांची नोंद घ्यावी.