ताज्या बातम्या

Mumbai Rain Update : मुंबईला रेड अलर्ट जारी! 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज

आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

Published by : Team Lokshahi

पावसाने काल पासूनच मुंबईमध्ये दमदार हजेरी लावली. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचले आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटे उशिराने चालू आहे. आता त्यातच हवामान खात्याकडून पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावलेली असून अनेक सखल भागात पाणी साचला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये 5 ते 6 फूट इतके पाणी साचले होते. त्यासोबतच आता मुंबईवर आणखी एक संकट पाहायला मिळणार आहे. समुद्राला उधाण आले असून लाटांचा वेग आणि उंची वाढलेली आहे. त्यामुळे समुद्राच्या किनाऱ्यावरती उंच उंच लाटा आपल्याला पाहायला मिळणार आहे.समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होण्याचे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहे. 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट मुंबईला दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट दिला आहे. पुढील 3 ते 4 तासांत या भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. शिवाय रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकही संथगतीने होत असल्याचं दिसून येत आहे. वेधशाळेने पुढील काही तास सतत पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबईतील समुद्रात हायटाईडचा धोका असणार आहे. यामुळे मुंबईतील सखलभागात पाणी साचणार आहे. दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मरीन ड्राईव्ह आणि समुद्रकिनारी भागामध्ये फिरायला न जाण्याचे आवाहन केलेले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा