थोडक्यात
राज्यभर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तास धोक्याचा इशारा जारी केला आहे.
काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक बाहेर पडू नये
राज्यभर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्येच हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तास धोक्याचा इशारा जारी केला आहे. काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळपासूनच या भागात पावसाला सुरुवात झाली असून काळोख वातावरण निर्माण झालं आहे. पुणे आणि जालना जिल्ह्यांसह इतर काही भागांमध्येही हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे भूम, परंडा परिसरातील नळी, दुधना आणि बानगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांमध्ये शेतशिवार पाण्याखाली गेले असून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज (शनिवार) येलो अलर्ट, तर रविवारी रेड अलर्ट घोषित केला आहे. मागील काही दिवसांचा पावसाचा ब्रेक संपून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
मागील आठवड्यात जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. आता पुन्हा रेड अलर्टमुळे नागरिक व शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.