भगवान शंकराला अत्यंत प्रिय असलेला आणि हिंदू धर्मात विशेष पवित्र मानला जाणारा श्रावण महिना यंदा महाराष्ट्रात २५ जुलै २०२५ पासून सुरू होत आहे. श्रावण शुक्ल प्रतिपदापासून या महिन्याला सुरुवात होणार असून, २३ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण अमावस्येच्या दिवशी याची समाप्ती होणार आहे.
श्रावण महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा, उपवास, व्रते, वैकल्ये केली जातात. या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, मंगळागौर यांसारखे धार्मिक आणि सांस्कृतिक सण मोठ्या भक्तिभावात साजरे केले जातात. विशेष म्हणजे, प्रत्येक सोमवार हा 'श्रावणी सोमवार' म्हणून ओळखला जातो आणि यंदा श्रावणात एकूण चार श्रावणी सोमवार येणार आहेत.
श्रावणी सोमवारचे दिनांक:
पहिला सोमवार – २८ जुलै
दुसरा सोमवार – ४ ऑगस्ट
तिसरा सोमवार – ११ ऑगस्ट
चौथा सोमवार – १८ ऑगस्ट
दरम्यान, उत्तर भारतात श्रावण महिन्याला आधीच म्हणजेच ११ जुलैपासून सुरुवात झाली आहे. मात्र महाराष्ट्रात श्रावण महिना हिंदू पंचांगातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथीपासून सुरू मानला जातो.
श्रावण महिना हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर पर्यावरण आणि निसर्ग पूजनाशी देखील निगडित आहे. त्यामुळे हा महिना अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.