कल्याण डोंबिवलीचा कचऱ्याचा विषय सध्या डोकंवर काढत आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतुक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. हा स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने चेन्नई पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकाराचा उपक्रम राबवणारी राज्यातील महाराष्ट्र आणि देशातील चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावळाराम क्रीडा संकुलात करण्यात आले. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे , मंत्री प्रताप सरनाईक आमदार रवींद्र चव्हाण, राजेश मोरे, सुलभा गायकवाड पालिका आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशिष ठोंबरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Covid 19 च्या' काळात चेन्नईने 2020 पासून उरबेसर सुमीत संस्थेच्या माध्यमातून यशस्वीपणे कचरा व्यवस्थापनात सुधारणा केली. शहराचा चेहराच बदलून टाकला. नागरिकांचा योग्य प्रतिसादामुळे चेन्नई शहराने गेल्या ४ वर्षात स्वच्छतेच्या बाबतीत अनेक विक्रम प्रस्थापित केले. आता हाच पॅटर्न कल्याण पूर्व, डोंबिवली व ग्रामीण भागातील 7 प्रभागांत "सुमित एल्कोप्लास्ट" संस्थेमार्फत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
याद्वारे कचरा संकलन, वाहतूक व रस्तेसफाईचे सूक्ष्म नियोजन यामध्ये करण्यात आले आहे. कचरा संकलन , वाहतूक आणि रस्तेसफाई या तीन महत्वाच्या मुद्यांवर या संकल्पनेमध्ये अधिक भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात येणार आहे.
या मॉडेलनुसार ३ शिफ्टमध्ये हे काम चालणार असून प्रत्येक घराबाहेरील कचरा उचलण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच मनुष्यबळाबरोबर पॉवर स्वीपर मशीन चा ही प्रभावी वापर करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेऊन ती सोडवण्याच्या दृष्टीने मोबाईल अँप ही तयार करण्यात येणार आहे. दरम्यान पलिकेच्या शहरांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शहर स्वच्छता अभियान राबवले जात आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कोणत्याही शहराचे नाव त्याच्या स्वच्छतेवरून होते.
या अभियानामुळे केवळ एकच शहर नाही तर, देशातील सर्व शहरे नावारूपास येतील. फक्त चेन्नईच नाही तर, कल्याण डोंबिवली पण एक नंबरला आलं पाहिजे असे प्रतिपादन यावेळी राज्याचे "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे" यांनी यावेळी केले. चेन्नई प्रमाणेच कल्याण डोंबिववलीचे ही नागरिक या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आणि त्यायोगे आपल्या शहराची एक नवीन ओळख निर्माण होईल अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली.