ताज्या बातम्या

Media Excellence Award : मीडिया एक्सलन्स पुरस्कार 2025; महाराष्ट्रातील दिग्गजांचा होणार गौरव!

माई मीडिया'च्या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राच्या सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,व्यक्तीमत्वांचा सन्मान होणार आहे.

Published by : Prachi Nate

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक असे हस्ती आहेत ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची मान देशातच नाही तर संपूर्ण जगभरात उंचावली आहे. त्यामुळे आशा व्यक्तींचा सन्मान करणे ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. आशा दिग्गजांचा सत्कार-सन्मान करण्याचे शिवधनुष्य माई मीडियाने हाती घेतलं आहे. 'माई मीडिया' प्रस्तुत आणि 'मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'च्या वतीने मीडिया एक्सलन्स पुरस्कार 2025 पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, तसेच बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के-सामंत यांचा विशेष सत्कार होणार आहे.

त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्र आणि ऐतिहासिक कार्य असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्य क्षेत्र आणि थँलसेमिया मुक्ती दूत असलेल्या सुजाता रायकर, साहित्यक्षेत्र आणि सांस्कृतिक योगदान असलेले डॉ.प्रदिप ढवळ, शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्य असलेल्या अनन्या गोयंका तसेच विशाल पाटील (संपादक,लोकशाही मराठी वृत्तवाहिनी) यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे. हा सोहळा दादर येथील वीर सावरकर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी मंगळवार 3 जून दुपारी 3 वाजता पार पडणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड