ताज्या बातम्या

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर लागू

पेट्रोल डिझेल दर महाराष्ट्रात कमी: आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा परिणाम.

Published by : Riddhi Vanne

पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मध्यमवर्गीय नागरिकांचे महिन्याचे अर्थगणित पेट्रोल डिझेलच्या दरावरच अवलंबून असते. अश्यातच आता आजपासुन पेट्रोल डिझेल चे नवीन दर लागु झाले असून या वेळेला महाराष्ट्रात हे दर कमी झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

साधारणपणे इंधनाचे दर हे सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात. त्यानंतर ते सर्वसामान्य नागरिकांना कळवले जातात. आज २० मे ला सकाळी हे दर जाहीर केले गेले त्यानुसार ठाणे जिल्ह्यात पेट्रोल चा दर १०३.७२ इतका असुन डिझेल चा दर ९०. २४ रुपये इतका आहे. कोकण आणि विदर्भात हा दर थोड्या फार फरकाने सारखा असुन नवीन दर आज सकाळ पासूनच संपुर्ण महाराष्ट्रात लागू झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्य्या मालाच्या किंमतीमध्ये चढउतार झाले, की त्या नुसार पेट्रोल डिझेल चे दर बदलत असतात. मात्र आता आपल्या शहरातील डिझेल पेट्रोलचे दर तुम्ही एका एस एम एसच्या क्लिकवर जाणून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला एका क्लिकद्वारे दर घरबसल्या समजू शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा