देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आता ही संख्या 3,395 इतकी वाढली आहे. त्याचसोबत गेल्या 24 तासांच्या कालावधीत 4 जाणांचा मृत्यु झाला असून केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच 8 राज्यांमध्ये 100+ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील एका 71 वर्षीय व्यक्तीचा न्यूमोनिया, सेप्टिक शॉक आणि किडनीच्या तीव्र दुखापतीमुळे मृत्यू झाला. कर्नाटकात 63 वर्षीय रुग्ण, केरळमध्ये 59 वर्षीय रुग्ण आणि उत्तर प्रदेशात 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. लोकांना नियमितपणे हात धुण्याची सवय असावी तसेच खोकताना, शिंकताना शिष्टाचार पाळावा. त्याचसोबत गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे आणि आवश्यक असल्यास मास्क वापरण्याचा सल्ला दिला गेला आहे.