मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नद्यांना महापूर आला असून, या महापुरामध्ये 16 गाव बाधित झालेली आहेत. त्यामुळे या गावातील लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये अडचणी येत आहेत. मध्यरात्रीपासून अन्न पाण्याविना तेथील नागरिक घरावर अडकून पडली आहेत, यात लहान मुलांसह महिलांचा आणि वयस्कर व्यक्तींचा देखील समावेश आहे.
यंत्रणा असून देखील नागरिकांना रेस्क्यू करणे किंवा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची मागणी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली आहे. त्यांच्या बचाव कार्यासाठी एन डी आर एफ ची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
30 जणांचा समावेश या तुकडी मध्ये करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून त्यांनी जवळपास दीडशे लोकांना सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे. दरम्यान एन डी आर एफ आणि एस डी आर एफने दिलेल्या निकषानुसार मदतीने दर काय? जाणून घ्या...