ताज्या बातम्या

Gaza Conflict : गाझामधील सुरु असलेले युद्धाची आता सांगता झाली पाहिजे; 25 देशांचे संयुक्त निवेदन

गाझामध्ये बऱ्याच दिवसांपासून चालू असलेले युद्ध आता संपुष्टात येणे अत्यंत गरजेचे असल्याचे एक संयुक्त निवेदन 25 देशांनी सोमवारी प्रसिद्ध केले.

Published by : Team Lokshahi

गाझामध्ये बऱ्याच दिवसांपासून चालू असलेले युद्ध आता संपुष्टात येणे अत्यंत गरजेचे असल्याचे एक संयुक्त निवेदन 25 देशांनी सोमवारी प्रसिद्ध केले. गाझा मधील युद्धामुळे तेथील लोकांचे जे अतोनात हाल होत आहेत. याचपार्शवभूमीवर हे निवेदन सादर करण्यात आल्याचे येत आहे.

गाझामधील युद्धाचा परिणाम हा तेथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. तिथल्या लोकांचे खूप हाल होत असून लहान मुलांनाही याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. लहान मुलांची सुद्धा यामध्ये अमानुषपणे हत्या करण्यात येत आहे. गाझामधील युद्ध त्वरित थांबवण्याची मागणी करणारे 25 देशांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध झाले आहे. या निवेदनाद्वारे, या देशांनी इस्रायलला आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, गाझामधील नागरिकांची दुर्दशा आणि त्यांना होणारा त्रास कमी करण्याची गरज व्यक्त केली आहे. या संयुक्त निवेदनामध्ये, ब्रिटन, कॅनडा, जपान आणि अनेक युरोपीय राष्ट्रांचा समावेश आहे. त्यांनी गाझामध्ये होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनावर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः, मुलांवरील हल्ले आणि अन्न-पाण्याची कमतरता यांसारख्या समस्यांवर लक्ष वेधले आहे. या देशांनी इस्रायलला गाझातील नागरिकांसाठी पुरेसा आणि सुरक्षित मदत पुरवठा निश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

या निवेदनामध्ये, गाझामध्ये युद्धबंदी आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच इस्राईलने आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याअंतर्गत आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करावे अशे निवेदन या 25 देशांमधून करण्यात आले आहे. या निवेदनावर युरोपीय महासंघाच्या आयुक्त्यांच्याही स्वाक्षऱ्या समाविष्ट आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis : "भाषेवरून मारहाण केल्यास, सक्त कारवाई..." मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

Barefoot Walking : दररोज 30 मिनिटे अनवाणी चालण्याचे फायदे, जाणून घ्या

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, दोन्ही याचिका फेटाळल्या

Latest Marathi News Update live : माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवरील दोन्ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली