आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक यांना धमकीचा फोन येत होता. आरोपीला सापळा रचून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हा फोन करणारा अज्ञात व्यक्ती हा उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्वीय सहाय्यक गायकवाड यांच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरुन सारखे फोन येत होते. फोन करणारा व्यक्ती स्वत: ला आयकर अधिकारी सांगून त्र्यंबकेश्वरमधील फार्म हाऊसवर रेड पडणार असल्याची धमकी देत होता. मदतीचा मोबदला म्हणून 1 कोटी रुपये मागत होता. स्वीय सहाय्यक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले आहे.