अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विविध देशांवर लावलेल्या टॅरिफ धोरणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून जागतिक पातळीवर तीनसह अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू केले. त्याचा थेट परिणाम सोन्यावर होत असून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. ज्यामुळे सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहे.
वर्षभरापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांनी पुन्हा दरवाढ झाली आहे. तर आजचा सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 25 हजारांच्या पार गेला आहे. गेल्या वर्षभरापासून सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्यामुळे वर्षभरात सोन्याच्या भावात 40% तर चांदीच्या भावात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मागील दिवाळीत 80 हजार रुपये असलेला सोन्याचा भाव यंदा सव्वा लाखांच्या घरात असून चांदीच्या दरालाही नवी झळाळी मिळाली असून चांदीच्या दराने ही आपला नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या तोंडावर सोन खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांची चिंता वाढली आहे. दरम्यान येत्या दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.