म्हाडाच्या घरांच्या किंमती 10 टक्क्यांपर्यंत कमी होणार असून समितीकडून आठवडाभरात अहवाल सादर केला जाणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरांच्या किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी म्हाडाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आता पूर्ण झाला असून पुढच्या आठवड्यात त्याचे सादरीकरण म्हाडा उपाध्यक्षांपुढे केले जाणार आहे.
घरांच्या किमती ठरवताना कोणत्या गोष्टी अंतर्भूत करायच्या आणि कोणत्या नाही याचा अभ्यास करून समितीने अहवाल तयार केला आहे. दरम्यान या अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईतील घरांच्या किमती साधारण आठ ते दहा टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात.