पुण्यातील मुंढवा व बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची “मास्टरमाईंड” शीतल तेजवानीच्या अडचणी वाढणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. शीतल तेजवानीविरुद्ध 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे. तसेच ती तिच्या राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाही.
ती नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे, जेणेकरून तिचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का? हे याबाबत माहिती मिळणार आहे. शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक या दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून शीतलच्या पतीवर 42 कोटींचे तर शीतलच्या कंपनीवर सहा कोटींचे कर्ज असल्याचं समोर आलं आहे.
त्याचसोबत पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अजब माहिती समोर आली आहे. जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानीने अमेडिया कंपनीकडून एक रुपयाही न घेता थेट खरेदीखत केला असल्याचं कारनामा समोर आलं आहे.
तसेच जमीन व्यवहारात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तावली जात आहे. तीनशे कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख खरेदीखतात नाही. मात्र सामान्यांच्या खरेदीखतावेळी किती पैसे दिले, पैसे कसे देणार आहात याचा उल्लेख खरेदीखतात असतो. यामुळे या जमीन व्यवहारात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तावली जात आहे.