ताज्या बातम्या

Railway News : रेल्वेचे जाळे विस्तारणार! ४०० किमीचे नवीन नेटवर्क, उपनगरीय मार्गावर हजारो फेऱ्या वाढणार

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे दररोज लाखो प्रवाशांचा प्रवास सुलभ करते. आता या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Published by : Varsha Bhasmare

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे दररोज लाखो प्रवाशांचा प्रवास सुलभ करते. आता या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, मुंबई उपनगरीय रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. सध्या उपनगरीय रेल्वेच्या तब्बल १४ महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम वेगाने सुरू असून, हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचे एकूण जाळे सुमारे ४००.५३ किलोमीटरने वाढणार आहे.

या प्रकल्पांमध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाचवा व सहावा मार्ग, पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग, कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरा व चौथा मार्ग, कल्याण ते कसारा दरम्यान पाचवा व सहावा मार्ग, हार्बर मार्गाचा बोरिवली ते विरार दरम्यान विस्तार, कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान पाचवा व सहावा मार्ग, तसेच ऐरोली ते कळवा एलिव्हेटेड मार्ग अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे उपनगरीय लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होणार असून, वेळेची अचूकता आणि प्रवासाचा वेग सुधारेल. अनेक प्रकल्प पुढील दोन ते पाच वर्षांच्या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता असून, यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील गर्दी कमी होईल. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेचे जाळे सुमारे ३९० किलोमीटरपर्यंत पसरले असून, मध्य, पश्चिम आणि हार्बर असे तीन प्रमुख मार्ग आहेत. नेरुळ–बेलापूर ते उरण दरम्यानचा चौथा मार्ग आधीच कार्यरत असून, या मार्गावर दररोज सुमारे ६५ लाख प्रवासी प्रवास करतात.

पनवेल, बदलापूर, कर्जत, उरण आणि विरार परिसरात परवडणाऱ्या दरातील गृहसंकुलांची मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे. त्यामुळे या भागांतून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे पायाभूत सुविधांचा हा विस्तार मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मध्य रेल्वेवरील प्रकल्प

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे लांबी २९.६ कि.मी. खर्च २७८२ कोटी

ऐरोली-कलवा एलिव्हेटेड मार्ग

लांबी ३.३ कि. मी. खर्च ३.५०८ कोटी

कल्याण-आसनगाव चौथा मार्ग

लांबी ३२ कि.मी. खर्च १,७५९ कोटी

कल्याण-बदलापूर तिसरा-चौथा मार्ग लांबी १४.०५ कि. मी. खर्च १.५१० कोटी

कल्याण-कसारा तिसरा मार्ग

लांबी ६७.३५ कि. मी. खर्च ७९२.८९ कोटी

निळजे-कोपर डबल कॉर्ड लाइन

लांबी ५ कि.मी. खर्च ३३८ कोटी

बदलापूर-कर्जत तिसरा चौथा मार्ग

लांबी ६४ किमी. खर्चः १,३२४ कोटी

आसनगाव-कसारा चौथा मार्ग

लांबी ३५ किमी खर्च ०३७.८५ कोटी

एकूण १८,३६४.९४ खर्च कोटी

एकूण ४००.५३ लांबी कि.मी

पश्चिम रेल्वे मार्गावरील नवीन उपनगरीय प्रकल्प

मुंबई सेंट्रल बोरिवली सहावा मार्ग

लांबी ३० कि मी, खर्चः ९१९ कोटी

गोरेगाव-बोरिवली हार्बर लाइन विस्तार

लांबी ७ कि. मी., खर्च ८९८ कोटी

गोरेगाव-मालाड विभागाचे काम मार्च २०२८

मालाड-बोरिवली विभागाचे काम डिसेंबर २०२८

बोरिवली- विरार पाचवा सहावा मार्ग

लांबी २६ कि. मी. खर्च २.१८४ कोटी

विरार-डहाणू सेड तिसरा चौथा मार्ग

लाबी ६५ कि. मी. खर्च ३.५८७ कोटी

नायगाव-जुर्वेद डबल कॉर्ड लाईन लांबी ६ कि.मी. खर्च १७६ कोटी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा