रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोटक महिंद्र बँकेवर 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेच्या कामकाजात आढळलेल्या त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयने केलेल्या तपासणीत कोटक महिंद्र बँकेने ‘बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट’ (BSBDA) संदर्भातील नियमांचे पालन न केल्याचं समोर आलं आहे. नियमानुसार पात्र ग्राहकाकडे अशा प्रकारचं केवळ एकच खाते असणं आवश्यक असताना, बँकेने काही ग्राहकांची अतिरिक्त खाती उघडल्याचं आढळून आलं.
याशिवाय बँकेच्या बिझनेस कॉरस्पॉन्डेंट्सना त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील कामकाज करण्याची मुभा दिल्याचं तपासात स्पष्ट झालं. तसेच काही कर्जदारांची चुकीची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना देण्यात आल्याचंही निदर्शनास आलं आहे. या चुकीच्या माहितीसामुळे संबंधित ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होण्याची शक्यता होती.
दंड लावण्यापूर्वी आरबीआयने कोटक महिंद्र बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेने या नोटीसीला उत्तर दिलं, मात्र तपासणीनंतर आरबीआय बँकेच्या उत्तराने समाधानी नसल्याचं स्पष्ट झालं. तपासात बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (नियमन) कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झालं.
आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, हा दंड केवळ नियमपालनातील त्रुटींमुळे लावण्यात आला असून, याचा बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांची जमा रक्कम, एफडी किंवा इतर गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे.
थोडक्यात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोटक महिंद्र बँकेवर 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बँकेच्या कामकाजात आढळलेल्या त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयने केलेल्या तपासणीत कोटक महिंद्र बँकेने ‘बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट’ (BSBDA) संदर्भातील नियमांचे पालन न केल्याचं समोर आलं आहे.