यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू झालेली, तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेली. परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील 15 मेपूर्वीच जाहीर केला जाणार आहे.
बारावीच्या विद्याध्यर्थ्यांचा आयटी विषयाचा पेपर राहिला असून 17 मार्चला परीक्षा संपणार आहे. दरम्यान, उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी-बारावीच्या विद्याथ्यर्थ्यांचे निकाल 15 मेपूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.