नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आज वैद्यनाथ मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद राहणार आहे. मतमोजणी नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीत होणार असून, पोलिसांनी परिसरात फौज फाटा तैनात केला आहे. काही दिवसांपूर्वी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राडा झाल्यामुळे प्रशासनाने आज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अलर्ट मोड जाहीर केला आहे.या मतमोजणीसाठी प्रशासनाची सजगता आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राड्यावर उतरे, त्यामुळे प्रशासनाने आजच्या मतमोजणीसाठी अलर्ट मोड जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नागरिकांना मार्गावरील गर्दी, वाहतुकीतील अडथळा याबाबत पूर्वसूचना दिली असून, वैकल्पिक मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना मार्गावरील गर्दी आणि वाहतुकीत अडथळा येऊ शकतो, याची पूर्वसूचना दिली आहे. नागरिकांना वैकल्पिक मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मतमोजणीसह संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुरक्षीत पार पाडण्यावर प्रशासनाचे लक्ष केंद्रित आहे.