महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. आज अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. गेली दहा दिवस गणेशभक्तांनी मनोभावे पूजलेल्या गणेश मूर्तींना आज विसर्जित करण्यात येणार आहेत.
आपल्या लाडक्या बाप्पांचे भावपूर्ण निरोप देताना गणेशभक्तांचा उत्साह आणि जल्लोष असतोच पण त्या सोबत "पुढच्या वर्षी लवकर या…" अशी प्रेमळ साद ही असते. मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला पावसाची हजेरी लागणार आहे. कालपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पहाटेपासूनही पाऊस सुरु आहे.
त्यामुळे आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज आहे. अशातच मुंबईतील लालबाग परिसरातील लालबागच्या राज्याच्या विसर्जनाच्या शाही मिरवणुकीला सुरुवात झाली असून लालबागचा राजा मुख्यप्रवेश द्वाराजवळ आला आहे.