ताज्या बातम्या

Kalyan building collapses : कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी घरमालकाला अटक

कल्याण स्लॅब दुर्घटना: घरमालकाला अटक, सहा जणांचा मृत्यू, जखमींची मदत सुरू

Published by : Team Lokshahi

काल कल्याण पूर्वेतील सप्तश्रुंगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चौथ्या मजल्यावरील दीपक चौरासिया या घरमालकाला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.

चिकणीपाडा परिसरातील सप्तश्रुंगी या इमारतीचे बांधकाम २००६ मध्ये करण्यात आले होते. मात्र या इमारतीला मागील वर्षीच पालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केले होते. तरीही या इमारतीमध्ये नागरिकांचे वास्तव्य होते. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील दीपक चौरासिया यांच्या घरात दुरुस्तीचे काम काल चालू होते. मात्र अचानक या घरातील स्लॅब कोसळला. एकमेकांच्या भाराने हे स्लॅब कोसळत गेले. स्लॅबच्या 'कोसळण्याने जोरदार आवाज झाला. नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ केली. इमारतीमधील इतर नागरिक आणि आजूबाजूची लोक बचावासाठी धावुन आले. मात्र स्लॅब कोसळल्यामुळे लोकांना आतजाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अग्निशमक दलाला बोलावण्यात आले. अग्निशमक दलाचे प्रमुख नामदेव चौधरी आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

आयुक्त अभिनव गोयल यांनी ठाणे जिल्हा आपतकालीन पथकाला बोलावले. त्यांनी लोकांना वाचवण्याचे काम तात्काळ सुरु करण्यात'आले. स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्यू पावले आहेत,तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दुर्घटनाग्रस्त इमारतीत दुरुस्तीचे काम करणाऱ्या घर मालक दीपक चौरासिया याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्लॅबचे काही नमुने गोळा करून तपासणीसाठी लॅबला पाठवले जाणार आहेत अशी माहिती कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज