महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मद्य विक्रेत्यांमध्येसुद्धा वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमांच्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, मद्य विक्रीच्या गुह्यांमध्ये तब्बल 37-49 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या व्यवसायात गुंतलेल्या 730 व्यावसायिक गुन्हेगार सापडले आहेत. आबकारी शुल्क विभागाने (Excise Department) 100 दिवासांमध्ये कोणती कामे केली? याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये महाराष्ट्रात अवैध दारु कारवाईत वाढ होण्याच्या उद्दिष्टे दिले होते. या कारवाईमध्ये आबकारी शुल्क विभागाला यश आले असून, 1 जानेवारी ते 15 एप्रिल या काळात राबवलेल्या कारवाईत तब्बल 21 हजार 118 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अवैध मद्य विक्रीच्या गुन्ह्यात 37.49 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत तब्बल 56 कोटी 48 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.