Share Market Updates Team Lokshahi
ताज्या बातम्या

Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला

Published by : Shweta Chavan-Zagade

आज जागतिक शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (share market) दिसून आला. सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टीतही (nifty) 250 हून अधिक अंकाची घसरण झाली आहे. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.

सेन्सेक्स आज 773.94 अंकांनी कोसळून 54,928.29 वर सुरु झाला. सेन्सेक्स सकाळी 9.30 वाजेपर्यंत 54,721.78ची पातळी गाठली होती. तर निफ्टी 267.1अंकांच्या घसरणीसह 16,415.55 वर सुरु झाला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत निफ्टी 50 मधील सर्वच्या सर्व 50 शेअर्स लाल रंगात ट्रेड करत होते. सकाळी 9.40 वाजेपर्यंत M&M, HEROMOTOCO, RELIANCE, ITC, COALINDIA, POWERGRID या शेअर्समध्ये वाढ दिसू लागली. मात्र अन्य 44 शेअर्समधील घसरण कायम होती.

गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. तर, आशियाई शेअर बाजारात पडझड सुरू आहे. हँगसेंग निर्देशांक 4 टक्क्यांनी कोसळला आहे. जागतिक स्तरावरही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशातील मध्यवर्ती बॅंकांकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत.

निफ्टी 50 मधील सर्व 50 शेअरमध्ये विक्रीचा दबाव असल्याने शेअर दर घसरला आहे. शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणावर विक्रीचा सपाटा सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत. बँकिंग शेअरमध्येदेखील घसरण सुरू आहे. बँक निफ्टीमध्ये 637.35 अंकाची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 34595 या अंकाच्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टीतील सर्व 12 स्टॉक्समध्ये घसरण सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा