ताज्या बातम्या

INDvsNZ : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सामन्याला नागपुरमध्ये आज होणार सुरूवात...

नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियममध्ये बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा थरार रंगणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियममध्ये बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा थरार रंगणार आहे. नववर्षातील पहिलीच टी-२०i लढत असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असून, त्याआधी ६ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघ विजयी सुरुवातीसाठी मैदानात उतरतील.

या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव करणार आहे. टी-२० फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे सूर्यकुमार यादववर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘कॅप्टन सूर्या’च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नववर्षातील पहिला सामना जिंकून आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर करणार आहे. सँटनरच्या शांत आणि संयमी नेतृत्वाखाली किवी संघ भारताला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामने नेहमीच चुरशीचे ठरले आहेत. विशेषतः टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळते. नागपूरच्या खेळपट्टीवर सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळते, तर सामन्याच्या उत्तरार्धात फिरकीपटू प्रभावी ठरतात. त्यामुळे कर्णधारांची रणनीती आणि खेळाडूंची अचूक अंमलबजावणी या सामन्यात निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, पहिल्या टी-२०i सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विकेटकीपर-फलंदाज इशान किशन या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. इशान किशनला तिलक वर्माच्या जागी संघात संधी मिळणार आहे.

तिलक वर्मा याला दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या तीन टी-२०i सामन्यांमधून बाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे मधल्या फळीत इशान किशनची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इशानकडून संघाला झटपट धावा आणि स्थैर्य दोन्हीची अपेक्षा असेल. विशेषतः पॉवरप्ले आणि मधल्या षटकांमध्ये त्याची कामगिरी सामन्याचा कल ठरवू शकते.

एकूणच, कॅप्टन सूर्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयी सलामी देत नववर्षाची सुरुवात विजयाने करणार की मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली किवी संघ नागपूरच्या मैदानावर बाजी मारणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर चाहत्यांना थरारक आणि रंगतदार सामना पाहायला मिळेल, यात शंका नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा