गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला असल्याची माहिती मिळत आहे. मार्च महिन्यामध्येच नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाल्याचं पाहायला मिळालं असता. आता एप्रिल-मे महिन्यात लोकांना चांगलाच घाम फुटणार आहे. आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी तपमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे.
सध्या गेल्या काही भागात अवकाळी पाऊस होत असल्याने तापमानात घसरण झाली आहे़ मात्र काही भागात अजूनही तापमानाचा पारा चढताच आहे. परभणीत पुढील दोन दिवसात उष्णतेची लाट हवामान विभागाकडून अलर्ट करण्यात आलेलं आहे. परभणी जिल्ह्यात सध्याचे तापमान 40 अंशाच्या वर गेले असून पुढील दोन दिवसात जिल्ह्मात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे