ताज्या बातम्या

तळवडेतील महिलांनी तयार केलेल्या तोरणांनी राजभवनाची वाढली शोभा

Published by : Siddhi Naringrekar

निसार शेख, चिपळूण

एखादी वस्तू आपण मेहनत घेत जीव लावून केल्यास त्यामध्ये अधिक कल्पकता येते. ती सर्वाच्या जरेतही भरली जाते. असाच प्रत्यय चिपळूण तालुक्यातील तळवडे येथील आदर्श स्वयंसहायता समुहाने तयार केलेल्या तोरणाच्याबाबती घडला. तालुक्यातील दुर्गम भागात, सह्याद्रीच्या कुशील वसलेल्या तळवडेतील महिलांनी तयार केलेले खणाचे तोरणाने राजभवनाची शोभा वाढवली आहे. या महिलांनी तयार केलेले तोरण राज्यपालांच्या पसंतीस उतरल्याने तळवडेच्या महिलांचे ६०० तोरणे राजभवनावर पोहोच झाले आहेत. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उप्तादीत मालांसाठी तयार केलेल्या बुकलेटने ही किमया साधली आहे.महिलांनी एकत्र येत विविध उद्योग व्यवसाय सुरू करावेत. त्यांना रोजगाराची साधने मिळावीत. महिलांचे जिवनमान सुधारावे, यासाठी गावा-गावात महिला बचत गटांची स्थापना झाली. गेल्या काही वर्षापासून बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण सुरू आहे.

तळवडे येथील आदर्श स्वयंसहायता समुहाची स्थापना जानेवारी २०२२ मधील. तालुक्यात सर्वात शेवटी स्थापन झालेल्या या बचत गटाने जिल्ह्यातील सुवर्णमय कामगिरी केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा ग्रामिण विकास प्रकल्प अधिकारी एन.बी. घाणेकर, आणि जिल्ह्यातील उमेद प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या योगदानातून महिला बचत गटांना बाजारपेठ मिळण्यासाठी एक बुकलेट तयार केले होते. त्यात गटांनी केलेल्या विविध वस्तूंची माहिती छायाचित्रासह दिली होती. राजकीय पदाधिकाऱ्यांसह मंत्रालय आणि राज्यपातळीवर त्याचे वाटप झाले होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिपावलीसाठी तोरणांची आवश्यकता होती. उमेदचे सीईओ डॉ. हेमंत वसेकर, मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांनी बुकलेटच्या पाहणीनंतर राज्यपालांना खणांच्या तोरणांची माहिती दिली. तळवडेतील महिला बचत गटाने तयार केलेली सहा ते सात प्रकारची तोरणे सॅम्पल म्हणून राजभवनात पाठविण्यात आली. ही राज्यपालांच्या पसंतीस उतरल्याने पहिल्या टप्प्यात २०० तोरणांचा पुरवठा या महिला बचत गटाने केला. ती तोरणेही कमी पडल्याने पुन्हा ४०० तोरणे देण्याची सुचना तळवडेतील आदर्श स्वयंसहायत गटाला केली. या महिलांनी सलग तिन दिवस १८ ते २० तास काम करून विक्रमी वेळेत तोरणे राजभवनावर पाोहोचवली.

कोकरे प्रभागाचे समन्वयक शुभम जाधव यांनी गटाला चांगले सहकार्य केले. पहिल्या टप्प्यात ५ तर नंतर १० महिलांनी तोरणांचे काम करीत दर्जेदार तोरणांची निर्मिती केली. तोरणांच्या दर्जाबाबत त्यांनी कोणतीच कमतरता ठेवली नाही. त्यांनी ४ ते ५ प्रकारची खणांची तोरणे तयार केली. शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यांपासून या तोरणांची निर्मिती झाली. या तोरणातून कोकणी ग्रामिण संस्कृतीचे दर्शनही होते. जिल्हा परिषदेचे सीईओ किर्ती किरण पुजार, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक अमोल काटकर यांच्यासह यंत्रणेने तळवडेच्या महिलांना पाठबळ दिले. वेळ काळ आणि अडचणींचा कसलाही विचार न करता विक्रमी वेळेत तोरणे तयार करून ती राजभवनात पोहोचवली आहेत.

Bhavesh Bhide : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप

Daily Horoscope 15 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मिळणार शुभ संकेत; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 15 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

HBD Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने करिअरमधून का घेतला होता ८ वर्षांचा ब्रेक?