Piyush Goyal's Clear Views On Trade Deal Ith America : भारत कोणत्याही देशासोबत व्यापार करार करताना वेळेच्या दबावाखाली निर्णय घेत नाही, असे प्रतिपादन वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. अमेरिकासोबतचा व्यापार करार तेव्हाच मान्य केला जाईल जेव्हा तो पूर्णतः चर्चेअंती तयार होईल आणि देशाच्या हिताला पूरक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोयल यांनी सांगितले की, सध्या भारत विविध देशांसह मुक्त व्यापार करार (FTA) करण्याच्या प्रक्रियेत आहे. यामध्ये युरोपियन युनियन, न्यूझीलंड, ओमान, अमेरिका, चिली आणि पेरू यांचा समावेश आहे. "व्यापार करारांचा उद्देश दोन्ही देशांना समान फायदा होणे हाच असतो. त्यामुळे अशा करारांमध्ये 'विजय-विजय' स्थिती असणे आवश्यक आहे," असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च धोरण आहे. जर व्यापार करार त्या निकषांनुसार ठरवला गेला, तर भारत विकसित राष्ट्रांबरोबर व्यवहार करण्यास सदैव तयार आहे." अमेरिका सोबतचा तात्पुरता करार ९ जुलैपूर्वी होईल का, असा प्रश्न विचारल्यावर गोयल यांनी उत्तर दिलं, “भारत कोणताही करार वेळेच्या चौकटीत अडकवून करत नाही. जेव्हा तो पूर्णतः तयार होईल आणि देशाच्या हितासाठी उपयुक्त असेल, तेव्हाच आम्ही तो स्वीकारू.” सध्या अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये व्यापारविषयक भेटीचा कोणताही कार्यक्रम नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा...