सध्या जगभरात इराण-इस्त्रायल यांच्या युद्धाची चर्चा आहे. या दोन्ही देशात युद्ध पेटून उठलं आहे. याचपार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना शांततेचा सल्ला दिला होता. तरी देखील दोन्ही देशांमधील युद्ध हे सुरुच आहे. यादरम्यान आता मोठा बातमी समोर येत आहे. इस्रायल-इराणच्या युद्धात अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर अमेरिकेकडून एअर स्ट्राईक करण्यात आला आहे.
फोडों, नतांज, इस्फहान या ठिकाणांवर अमेरिकेकडून एअर स्ट्राईक हल्ला करण्यात आला. यामुळे फोडो आण्विक केद्रावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दलची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत दिली. दरम्यान इराणवर एअर स्ट्राईक केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित केलं, यात त्यांनी इराणच्या हल्ल्याबाबत माहिती दिली, इराणने आता शांततेच्या मार्गावर आलं पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
"आम्ही इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान या तीन अणुऊर्जा केंद्रांवर यशस्वी हल्ला केला आहे. सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. फोर्डो या प्राथमिक केंद्रावर बॉम्बचा पूर्ण पेलोड टाकण्यात आला आहे. सर्व विमाने सुरक्षितपणे घरी परतत आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद".