प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी संपली असून कोल्हापूर सत्र न्यायालय उद्या याबाबत निकाल देणार आहे. प्रशांत कोरटकरला बेल की जेल? याबद्दल उद्या निकाल लागणार आहे. कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पार पडणार आहे. तसेच कोरटकरचा जामीन कायम राहणार की फेटाळला जाणार याचा निर्णय येण्याची शक्यता आहे. तर सध्या प्रशांत कोरटकरला अटकेपासून सुरक्षित असून दुपारी 3 नंतर सुनावणी पार पडणार आहे. याचपार्श्वभूमिवर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे वकिल असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वकिल असीम सरोदे म्हणाले, "कोरटकर यांनी कोनाकोणाशी बोलून हा कॉल केला होता आणि कोणाबरोबर बोलणे झाले आहे ? हे समजणे अतिशय गरजेचे आहे. कोरटकर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट केला. एवढच नाही तर त्यांचा मोबाईल तपासण्याची संधी दिली नाही. कोरटकरने कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत, तपास यंत्रणांनेला फसवलं आहे. डेटा मिळाला असता तर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या. कोरटकरने ब्राह्मण, मराठा समाजाचा अपमान केला. कोरटकरचा मोबाईल हॅक झाला की नाही? हे तपासावे", असं वकिल असीम सरोदे म्हणाले आहेत.