Team Lokshahi
ताज्या बातम्या

उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या रत्नागिरीतील वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद

अत्याधुनिक कानाचे मशीन मिळाल्यामुळे भूमी हिचे जगणे झाले सुसह्य

Published by : shweta walge

निसार शेख, रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या रत्नागिरीतील वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद असून या माध्यमातून असंख्यांच्या जगण्याला बळ मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. भूमी या कर्णबधिर मुलीला वैद्यकीय मदत कक्षाकडून मदत मिळाल्यामुळे तिचे जगणे सुसह्य झाले आहे.

देवरुख, काटवली येथील रहिवासी श्री मंगेश पर्शराम यांची मुलगी कु.भूमी ही कर्णबधिर असल्याने तिला दैनंदिन जीवनात अडचणी येत होत्या. मुलीच्या उपचारासाठी मार्गदर्शन मिळावे या हेतूने त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीमधील जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय मदत कक्ष विभागाशी संपर्क साधला. या मुलीच्या आजाराची सर्व माहिती घेऊन आरोग्य मित्र तथा वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैदयकीय मदत विभागाचे रत्नागिरी तालुका प्रमुख श्री सागर भिंगारे हे सदर मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे घेऊन गेले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले (ENT Surgeon) यांनी कु.भूमी या कर्णबधिर मुलीची जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिला आवश्यक असणारे कानाचे मशीन सूचित केले. पालकमंत्री उदय सामंत यांना याबाबत संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य प्रशासनाला सूचना करून ऑडिओमेट्री रिपोर्टनुसार दोन्ही कानाला आवश्यक असणारे कानाचे मशीन BTE HEARING AID (कानामागे लावणारे डिजिटल मशीन ) त्वरित मागवण्याचे आदेश दिले.

पालकमंत्री श्री. सामंत यांच्या प्रयत्नामुळे आवश्यक असणारे मशीन लवकर उपलब्ध झाले. आज या भूमीला हे मशीन देण्यात आले. यावेळी, बाळासाहेबांची शिवसेना रत्नागिरी शहरप्रमुख बीपीन बंदरकर,फणसोप ग्राम पंचायत सदस्य राकेश साळवी, दीपक मोरे, विलास साळवी, किरण कामतेकर, रवी शिखरे, सागर भिंगारे, डॉ. कशेळकर व सर्व संबंधित उपस्थित होते.

ही नववीची शालेय विद्यार्थ्यांनी असून या अत्याधुनिक कानाच्या मशीनमुळे तिला शालेय आणि दैनंदिन जीवनात मोलाची मदत मिळालेली आहे. उदय सामंत यांचे जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयातून नेहमीच वैद्यकीय प्रश्नांसाठी नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि संपूर्ण सहकार्य केले जाते. तसेच विविध योजना त्यांची माहिती, वैद्यकीय मदत, रुग्ण त्यांचे नातेवाईक यांचे समुपदेशन हे काम या कार्यालयात समर्पित भावनेतून सुरू असते नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आजपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून ४०७ रुग्णांसाठी सुमारे २ कोटींचा मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ज्या माध्यमातून अनेकांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होऊन ही मंडळी आज निरोगी आयुष्य जगत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं