ताज्या बातम्या

Elon Musk : एलन मस्क यांनी X वर पुन्हा एकदा नाव बदललं! 'Gorklon Rust' या नावा मागचा अर्थ काय आहे?

एलन मस्क: 'Gorklon Rust' या नावाचा अर्थ काय? X वर नाव बदलण्यामागे AI प्रकल्पाची रणनीती.

Published by : Team Lokshahi

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि X (माजी ट्विटर) चे मालक एलन मस्क यांनी पुन्हा एकदा आपल्या युजरनेममधून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी त्यांनी ‘Gorklon Rust’ हे नाव निवडलं असून, नेटकऱ्यांमध्ये याची चर्चा जोमात सुरू आहे. या नव्या नावाचा अर्थ काय असू शकतो, यावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत मस्क यांनी तिसऱ्यांदा आपलं युजरनेम बदललं आहे. याआधी ते 'Kekius Maximus' (डिसेंबर 2024) आणि 'Harry Bolz' (फेब्रुवारी 2025) या नावांनी ओळखले जात होते.

‘Gorklon Rust’ या नावाचा अर्थ काय?

‘Gorklon’ या नावात दोन संज्ञा एकत्र आल्यासारखं वाटतं – ‘Grok’ आणि ‘clone’. ‘Grok’ हा AI चॅटबॉट xAI या कंपनीने तयार केला आहे, तर ‘clone’ म्हणजे त्याची प्रतिकृती. यामधून असा अंदाज बांधता येतो की, मस्क एखादं नविन AI मॉडेल किंवा त्याचा एक पर्याय तयार करत आहेत. दुसरीकडे, ‘Rust’ ही प्रोग्रामिंग भाषा xAI तंत्रज्ञानात वापरली जाते. त्यामुळे हे नाव एखाद्या प्रगत AI प्रोजेक्टचा इशारा असू शकतो, जो Rust भाषेत तयार केला जात आहे.

काही तज्ञ आणि युजर्सचा अंदाज आहे की मस्कचं हे नाव बदलणं केवळ मनोरंजनासाठी नाही, तर यामागे काही रणनीती दडलेली आहे. ‘Gork’ नावाचं एक मीम-आधारित क्रिप्टो कॉइन Solana नेटवर्कवर आधीच अस्तित्वात आहे. मस्क कदाचित या कॉइनकडे लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतील. नुकतंच त्यांनी X वर ‘Gork’ नावाच्या एका हँडलला टॅग केलं होतं, जो मूळ ‘Grok’ अकाउंटपेक्षा वेगळा आहे आणि त्याच्या मजेदार, उपरोधिक शैलीमुळे ओळखला जातो. ‘Grok’ हा शब्द एलन मस्क यांनी त्यांच्या AI प्रकल्पासाठी वापरला होता. या शब्दाचा उगम प्रसिद्ध विज्ञान काल्पनिक कादंबरी The Hitchhiker’s Guide to the Galaxy मधून झाला आहे, आणि याचा अर्थ असतो – एखाद्या गोष्टीला पूर्णपणे समजून घेणे. आत्तापर्यंत या AI चॅटबॉटचे तीन वर्जन बाजारात आले असून, लवकरच त्याचं 3.5 वर्जन लाँच होणार असल्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू