ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता

आज हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला बहुतांशी ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

Published by : Dhanshree Shintre

आज हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला बहुतांशी ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील इतर भागात आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार