Raj Thackeray On Alliance 
ताज्या बातम्या

मनसेत मोठे फेरबदल होणार, बैठकीत काय घडलं? संदीप देशपांडे म्हणाले…

आगामी निवडणुकांसाठी मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

Published by : Gayatri Pisekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत युती करणार का असा सवाल उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर विधानसभेमध्ये राज ठाकरे यांनी मनसेने पूर्ण ताकदीने निवडणुक लढवली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. कारण मनसेला एकही जागा निवडून आणता आली नसल्याने राज ठाकरेंवर पराभवाची नामुष्की ओढावली. त्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसे काय भुमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक झाली. या बैठकीत मनसेत मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. विधानसभेत झालं ते आता विसरा. निवडणुकीत यश-अपयश येत राहतं असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. महापालिकेला कसं सामोरं जायचं याबाबत बैठकीत चर्चा झाली. पक्षाचा रिफॉर्म लवकरच होईल, पक्षात महत्वाचे अंतर्गत बदल होणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. युतीबाबत चर्चा होतच राहणार असून अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असल्याचं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत काय रिफॉर्म केले पाहिजेत यावर चर्चा होईल. मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी उभा राहणारा पक्ष म्हणून लोकांच्या तोंडी मनसेच नाव येतं हे मनसेचं यश आहे. भाजपला मतदान करणारे कानडी लोकं आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रत्नागिरी ते दादर धावणारी ट्रेनच्या ऐवजी आता त्याच वेळापत्रकात ट्रेन उत्तर प्रदेशपर्यंत धावणार आहे ही पत्रकाराने माहिती दिल्यानंतर उत्तर प्रदेश आणि गुजरातवरून येणाऱ्या ट्रेनची संख्या का वाढवण्यात येते हा संशोधनाचा विषय असल्याचं मत देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

बुलेट ट्रेन सुरु करायची होती तर ती अहमदाबाद ते मुंबईचा का? दिल्लीपासून बुलेट ट्रेन का नाही. लॉन्ग डिस्टन्स बुलेट ट्रेन सुरू करायला हवी अहमदाबादच का असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा