Pankaja Munde : 'ओबीसींवर अन्याय होणार नाही', मराठा आरक्षणानंतर पंकजा मुंडेंचं ठाम मत  Pankaja Munde : 'ओबीसींवर अन्याय होणार नाही', मराठा आरक्षणानंतर पंकजा मुंडेंचं ठाम मत
ताज्या बातम्या

Pankaja Munde : 'ओबीसींवर अन्याय होणार नाही', मराठा आरक्षणानंतर पंकजा मुंडेंचं ठाम मत

“सर्व समाज आनंदाने जगावेत हीच आपली इच्छा आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, यासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे.

Published by : Team Lokshahi

Pankaja Munde On OBC Reservation : “सर्व समाज आनंदाने जगावेत हीच आपली इच्छा आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, यासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे. जर कुणाला वाटत असेल की या जीआरमुळे ओबीसींचा हक्क धोक्यात येतोय, तर दोन महिन्यांच्या कालावधीत त्याचा आढावा घेऊन स्पष्टता केली जाईल,” असं आश्वासन त्यांनी दिलं.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर राज्यात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे दोन स्वतंत्र विषय आहेत. माझं याबाबतचं मत आधीपासून स्पष्ट आहे आणि पुढेही तेच राहील,” असं त्या म्हणाल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नोंदींची पडताळणी करून पात्र मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. या निर्णयावर भाष्य करताना मुंडे म्हणाल्या, “मराठा समाजासाठी शासनाने जीआर काढला आहे. मात्र, ओबीसी समाजावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून स्वतंत्र समितीही स्थापन केली आहे. सरकार यावर योग्य तो तोल साधेल.”

“सर्व समाज आनंदाने जगावेत हीच आपली इच्छा आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, यासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे. जर कुणाला वाटत असेल की या जीआरमुळे ओबीसींचा हक्क धोक्यात येतोय, तर दोन महिन्यांच्या कालावधीत त्याचा आढावा घेऊन स्पष्टता केली जाईल,” असं आश्वासन त्यांनी दिलं.

हैदराबाद गॅझेट अंमलात आल्यानंतर मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला फायदा होईल, असंही बोललं जातं. कारण, आतापर्यंत सापडलेल्या तब्बल 58 लाख नोंदींवरून अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! ऑगस्ट, सप्टेंबरला हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता?

Latest Marathi News Update live : विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावचं लागेल….

UP News : समोसा नाही आणला म्हणून बायको नवऱ्यासोबत जे काही केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...

Chandrashekhar Bawankule : ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, दिले पहिले आश्वासन