थोडक्यात
15 वर्षानंतर होणार मुंडे बहीण भावाची युती होण्याची चर्चा
नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार
भाजपकडून बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप
परळीच्या राजकारणात (Parli Municipal Election 2025) ऐतिहासिक घडामोडदीर्घ काळानंतर घडली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे (Pankaja Munde Dhananjay Munde alliance) हे 15 वर्षांनी एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत दोघांमध्ये युती होणार आहे. या युतीवर आज दोन्ही नेत्यांकडून अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार
परळी नगर परिषदेच्या 35 जागांपैकी भाजप 12 ते 15 जागांवर, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 20 ते 23 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2016 च्या निवडणुकीत भाजप महायुतीला केवळ 5 जागांवर विजय मिळाला होता, तर राष्ट्रवादी आघाडीने तब्बल 28 जागा जिंकून सत्ता हस्तगत केली होती. मात्र मुंडे बहीण-भावांच्या एकत्रित नेतृत्वामुळे (Munde siblings political alliance)यंदा परळीचा राजकीय समीकरणांचा पटच बदलणार असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे आगामी परळी नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
भाजपकडून बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप
दरम्यान, भाजपकडून बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप पूर्ण झाले असून, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काल उशिरा संध्याकाळी पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून फॉर्म रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित काही जागांवरील उमेदवारांची घोषणा पुढील दोन ते तीन दिवसांत करण्यात येणार आहे.