Dangerous Airports In India : उड्डाणाआधी श्वास रोखावा लागतो! 'ही' आहेत भारतातील सर्वात धोकादायक विमानतळ Dangerous Airports In India : उड्डाणाआधी श्वास रोखावा लागतो! 'ही' आहेत भारतातील सर्वात धोकादायक विमानतळ
ताज्या बातम्या

Dangerous Airports In India : उड्डाणाआधी श्वास रोखावा लागतो!, 'ही' आहेत भारतातील सर्वात धोकादायक विमानतळ

धोकादायक विमानतळ: भारतातील सर्वात आव्हानात्मक रनवे, पायलटसाठी कस लागणारा अनुभव.

Published by : Riddhi Vanne

गुजरातमधील अहमदाबाद शहरात नुकताच एक भीषण विमान अपघात घडला आहे. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि एकूण 242 प्रवासी होते. या घटनेने पुन्हा एकदा देशातील काही अत्यंत धोकादायक रनवे Runway आणि विमानतळांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. भारतात काही विमानतळ असे आहेत, जिथे विमान चालवणं म्हणजे पायलट Pilot साठी एक प्रकारचा कस लागणारा अनुभव असतो. कमी लांबीचे रनवे, डोंगराळ किंवा समुद्रसपाटीवर असलेली भौगोलिक स्थिती आणि हवामानातील बदल यामुळे ही ठिकाणं अत्यंत आव्हानात्मक बनतात. चला, आता पाहूया भारतातील पाच सर्वात धोकादायक आणि लहान रनवे कोणते आहेत.

1. बाल्झॅक विमानतळ, मेघालय – 3,300 फूट

मेघालयातील बाल्जेक विमानतळाची रनवे लांबी केवळ 3,300 फूट आहे. हे विमानतळ छोट्या विमानांसाठी तयार करण्यात आला असून, सध्या कार्यरत नाही. तरीसुद्धा, निसर्गरम्य परंतु आव्हानात्मक परिसरामुळे हे एक धोकादायक स्थान मानले जाते.

2. भुंतर (Kullu Manali) विमानतळ, हिमाचल – 3,691 फूट

हिमालयाच्या कुशीत असलेले हे विमानतळ पर्यटनासाठी महत्त्वाचे असले तरी त्याचा रनवे डोंगरांमध्ये आहे. लँडिंगसाठी पायलटला अत्यंत अचूक नियंत्रण ठेवावे लागते. 3,691 फूट रनवे असलेल्या या ठिकाणी हवामानही मोठा अडथळा ठरतो.

3. शिमला (जुब्बरहट्टी) विमानतळ – 3,691 फूट

थंडी, धुके आणि कमी दृश्यमानता शिमल्याजवळ असलेल्या या विमानतळावर अशा अनेक अडचणी उभ्या राहतात. रनवे छोटा असल्यामुळे आणि हवामान सैरभैर असल्यानं इथे विमान उडवणं खूप धाडसाचं काम आहे.

4. अगत्ती विमानतळ, लक्षद्वीप – 4,235 फूट

समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा छोटा विमानतळ लक्षद्वीप बेटांना मुख्य भूमीशी जोडतो. येथे केवळ 4,235 फूट लांबीचा रनवे असून, वाऱ्याचा वेग, ओहोटी-पानतीसारखे समुद्री बदल आणि मर्यादित जागेमुळे पायलटला प्रत्येक उड्डाणात प्रचंड काळजी घ्यावी लागते.

5. बालुरघाट विमानतळ, पश्चिम बंगाल – 4,905 फूट

ब्रिटीश काळात लष्करी वापरासाठी उभारलेले हे विमानतळ आजही काही ठराविक उड्डाणांसाठी वापरले जाते. मात्र जुनी पायाभूत सुविधा, अपूर्ण व्यवस्थापन आणि छोटा रनवे हे या विमानतळाचे मोठे धोके आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test