केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील आठवड्यात वार्षिक फास्टटॅगच्या योजनेची घोषणा केली. यामध्ये कार जीप व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी तीन हजार रुपयांचा वार्षिक फास्टटॅग पास देण्याची घोषणा केली. यामध्ये वर्षभरामध्ये या टोलनाक्यावरून हीच वाहने पास वापरून प्रवास करू शकतात. या राष्ट्रीय महामार्गावरती वर्षाला तुम्हाला 200 वेळा या पासचा वापर करून जाता येणार आहे.
मात्र फास्ट टॅगवर आधारित जो पास आहे तो फक्त राष्ट्रीय महामार्गासाठीच वैध असणार आहे .महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग आणि अटल सेतु महामार्ग या दोन्ही मार्गावरती फास्टटॅगचा वार्षिक पास लागू होणार नाही तिथे वाहनधारकांना टोल द्यावाच लागणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर देखील हा पास लागू होणार नाही
राष्ट्रीय महामार्गाच्या नावाची सुरुवात NH ने होते तर राज्याच्या महामार्गाची सुरुवात MH किंवा MSH ने होते. त्यामुळे NH ने सुरुवात होणाऱ्या महामार्गावरच फास्ट टॅगचा वार्षिक पास लागू होणार आहे. मात्र असे असले तरी मुंबई पुणे जुना महामार्ग हा एक राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरून तुम्हाला हा पास वापरता येणार आहे. त्याचबरोबर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वाहन चालकांना सुद्धा या फास्ट टॅगच्या वार्षिक पास चा फायदा होणार आहे. पुणे, सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग आहे. पुण्यातील राष्ट्रीय महामार्गावरती सर्वाधिक दहा टोलनाके असून सोलापूर मधील राष्ट्रीय महामार्गावर नऊ टोलनाके आहेत. तर नागपूर मध्ये सहा धुळ्यामध्ये पाच बीडमध्ये चार बुलढाणा मध्ये तीन असे राष्ट्रीय महामार्ग आहेत.या महामार्गावरून जाणाऱ्या लोकांना फास्ट टॅगचा वार्षिक पास वापरता येणार आहे.
15 ऑगस्ट पासून या फास्टटॅगच्या वार्षिक पास ची सुरुवात होणार असून याची मुदत एक वर्ष किंवा 200 वेळा ये-जा करणे अशी आहे. वर्ष संपण्याआधी 200 टोल झाल्यानंतर पुन्हा 200 टोलसाठी वर्षभरासाठी तुम्हाला पास खरेदी करावा लागणार आहे. मात्र हा फास्ट टॅग चा पास टोलनाक्यावरून रोज प्रवास करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. कधीतरी येणाऱ्यांसाठी 3000 रुपयांचा मासिक पास हा महाग पडू शकतो.