थोडक्यात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मुंबईत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी अमित शहांना ॲनाकोंडा म्हणाले,
या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray Statment : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मुंबईत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित होते. मतदार याद्यांतील वाढता गोंधळ आणि बोगस नावांच्या प्रकरणाचा मुद्दा यावेळी चांगलाच ऐरणीवर आला. या प्रकरणात पक्षातील पदाधिकाऱ्यांना सक्रिय भूमिका घेण्याचा स्पष्ट निर्देश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. “लोकशाहीत मतदार सरकार निवडतात. पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. सरकारच ठरवतंय कोण मतदान करणार आणि कोण नाही. हे लोकशाहीला गिळणारे कारस्थान आहे.” या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते बावनकुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बावनकुळे म्हणाले की, "हे काय अमित शहांना ॲनाकोंडा बोलतात ते स्व:ता अजगर आहेत . त्यांनी पुर्ण शिवसेना गिळली आहे."