नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने–चांदीच्या दरांकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत असून, 30 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही योग्य संधी ठरू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
भारतात 30 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13,924 रुपये असून, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 12,764 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 10,443 रुपये नोंदवण्यात आला आहे. याचप्रमाणे, प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर पाहता 22 कॅरेट सोनं 1,27,640 रुपये, 24 कॅरेट सोनं 1,39,240 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 1,04,430 रुपये इतकं आहे. चांदीच्या दरातही आज वाढ-घट दिसून आली आहे. 30 डिसेंबर रोजी भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम 257.90 रुपये असून, प्रति किलो चांदी 2,57,900 रुपयांवर पोहोचली आहे. उद्योग आणि दागिन्यांच्या मागणीमुळे चांदीच्या दरात सातत्याने हालचाल होत असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, 29 डिसेंबर रोजी सोन्याचे दर आजच्या तुलनेत अधिक होते. त्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 14,121 रुपये, 22 कॅरेट 12,944 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 10,591 रुपये इतकं होतं. तर चांदीचा दर प्रति किलो 2,50,900 रुपये नोंदवण्यात आला होता. म्हणजेच अवघ्या एका दिवसात सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद, केरळ आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये आज जवळपास समान दर आहेत. या सर्व शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,27,640 रुपये, 24 कॅरेट 1,39,240 रुपये आणि 18 कॅरेट 1,04,430 रुपये इतकाच आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची हालचाल, महागाई आणि मध्यवर्ती बँकांचे धोरण यांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे. त्यामुळे सोने खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी ताज्या दरांचा आढावा घेणे गरजेचे आहे. येत्या काळात सण-उत्सव आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने दर पुन्हा वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.