थोडक्यात
मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटातील तिसऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
मनोज जरांगे यांनी आरोप केलेल्या कांचन साळवेला अटक
कांचन साळवे हा धनंजयमुंडे यांचा स्विय्य सहाय्यक ?
कटातील संशयित आरोपी कांचन साळवे याला जालना पोलिसांनी रात्री उशिरा बीडमधून अटक केली आहे. या अगोदर दोन आरोपींना जालना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कांचन साळवे याला बीड शहरातून ताब्यात घेण्यात आले. कांचन साळवे हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक असून बीड शहरातील काही कामे तो पाहायचा अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हत्याच्या कटाचा खुलासा करताना मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत कांचन साळवे याचे नाव घेतले होते.
मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणी जालना पोलिसांनी आणखी एकाला बेड्या ठोकल्या. जालना पोलिसांनी मंगळवारी रात्री बीडमधून कांचन साळवी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिसरा आरोपीला पोलिसांनी अटक केली. याआधी दादा गरुड, अमोल खुणे यांना पोलिसांनी अटक केली असून चौकशी करण्यात येत आहे.
दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा उल्लेख आणि आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. मंगळवारी रात्री उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याला जालन्यातील अंबड येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान साळवी याला अटक केल्यानं आता या प्रकरणात साळवी पोलिसांकडे काय खुलासे करतो याकडे सगल्याच लक्ष लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्याची हत्या करण्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आलयाचा खुलासा झाला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटील आणि समर्थकांनी याबाबत जालना पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडून त्यानंतर तपास करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी हत्येच्या कटाचा आरोप आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केला होता. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, माझ्याकडे पुरावे आहेत, असा आरोप जरांगेंनी केला होता. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. धनंजय मुंडेंनी आपल्यावरील आरोपाचे खंडन केले होते. आता जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या समर्थकाला अटक केली आहे. साळवी पोलिसांसमोर काय काय उघड करणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.