थोडक्यात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर....
आज सांगलीत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार...
बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओसारख्या गाड्या....
(Bullock Cart Race )सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे चंद्रहार पाटील यांनी "श्रीनाथ केसरी" नावाने आज मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे.
ही देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत मानली जात आहे आणि या स्पर्धेचे विजेत्यांना फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर आणि मोटरसायकल अशी मोठी बक्षिसे दिली जातील. या निमित्ताने बैलगाडी संघटनेचे अधिवेशन देखील पार पडणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत,या बैलगाडी शर्यत व अधिवेशन संपन्न होणार आहे. एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता स्पर्धेच्या ठिकाणी पोहतील.