ताज्या बातम्या

Uday Samant : राज्यात 'या' जिल्ह्याला मिळणार नवीन विमानतळ

एकीकडे नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटनाकडे सर्वांचे लक्ष्य असताना आता महाराष्ट्राच्या प्रवाशांना आणखी एका नव्या विमानतळाची भेट मिळणार आहे. हे विमानतळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणार आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • महाराष्ट्राच्या प्रवाशांना आणखी एका नव्या विमानतळाची भेट मिळणार

  • कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात हे विमानतळ सुरु होणार

  • रत्नागिरी विमानतळ कधी होणार सुरु ?

एकीकडे नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटनाकडे सर्वांचे लक्ष्य असताना आता महाराष्ट्राच्या प्रवाशांना आणखी एका नव्या विमानतळाची भेट मिळणार आहे. हे विमानतळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विमानतळाबाबत माहिती दिली आहे. पुढील 6 ते 7 महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील हे विमानतळ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार होईल. हे विमानतळ पूर्णपणे एप्रिल 2026 पर्यंत कार्यान्वित होईल तसेच यामुळे केवळ 1 तासात मुंबई ते रत्नागिरी 326 KM चे अंतर पार करता येणार आहे. असं उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं. यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनेक अडचणींचा सामना मुंबईहून कोकणात जायचं म्हंटल तर करावा लागतोय.. अजून १०० टक्के मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. रेल्वेने जायचं म्हंटल तर तिथेही खूप गर्दी असते. मुंबई ते रत्नागिरीचे अंतर सुमारे 326 किलोमीटर आहे. 7-8 तास रस्त्याने प्रवास केल्यास लागतात, रेल्वे ने सुद्धा हीच अवस्था आहे. अशावेळी रत्नागिरी येथील विमानतळ कोकणवासीयांना खूप फायदेशीर ठरेल. कारण एकदा का रत्नागिरी विमानतळ (Ratnagiri Airport) सुरू झाले कि मग मुंबई आणि कोकणमधील प्रवास फक्त 1 तासात पार केला जाऊ शकतो. यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचेल.

रत्नागिरी विमानतळ कधी होणार सुरु ?

रत्नागिरी विमानतळाच्या (Ratnagiri Airport ) प्रगतीबाबत मंत्री उदय सामंत यांनी अपडेट्स देताना म्हंटल कि, पुढील 6-7 महिन्यांत हे विमानतळ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्ण तयार होईल. एप्रिल 2026 पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल. याशिवाय रत्नागिरी फ्लाईंग क्लबची स्थापना केली जाईल, ज्यामुळे या भागात एरोबॅटिक प्रशिक्षण आणि लहान विमानांच्या ऑपरेशन्ससाठी नवीन सुविधा उपलब्ध होतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Make Fasting Gulab jamun during Navratri : आता नवरात्रीमध्ये बनवा उपवासाचे गुलाबजाम

National Film Awards 2025 : शाहरुख खानला त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर! जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

Special Trains : भारतीय रेल्वेची विशेष तयारी…,छठ आणि दिवाळीसाठी स्पेशल ट्रेन धावणार

Poonam Pandey : "...म्हणून, आम्ही पूनम पांडेला ही भूमिका न देण्याचा निर्णय घेतला" मंदोदरी वादानंतर रामलीला समितीचा मोठा निर्णय