आज मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि भाईंदर दरम्यान शनिवारी मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 पर्यंत मेगा ब्लॉक आहे. यावेळी धिम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. मध्य रेल्वेवर 10.40 ते 3.40 पर्यंत ब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 9:34 ते दुपारी 3:03 पर्यंत सुटणाऱ्या लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्ददरम्यान ब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत ट्रान्स हार्बर लाइनवर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी परवानगी आहे.