ताज्या बातम्या

Weather Report : यंदा वेळेआधीच मान्सूनचं आगमन, अंदमान निकोबारमध्ये कधी धडकणार?

मान्सून अंदमानात: उष्णतेच्या लाटेमुळे मान्सून वेळेआधी, हवामान विभागाचा अंदाज.

Published by : Team Lokshahi

देशभरात गेल्या पन्नास दिवसांपासून सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे वातावरणात मोठे बदल झाले. त्याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावरही होणीर अशी चिन्हं दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, मान्सून यंदा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधीच अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. 13 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज मंगळवारी 6 मे रोजी व्यक्त करण्यात आला.

सामान्यतः मान्सून 18 ते 22 मे दरम्यान अंदमान-निकोबारमध्ये पोहोचतो. मात्र यंदा बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान झपाट्याने वाढल्यामुळे, मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होत आहे. परिणामी, हवामानात बदल होऊन बाष्पयुक्त ढगांची निर्मिती वाढली आहे. त्यामुळे मान्सूनची हालचाल अधिक लवकर सुरू झाल्याचे हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या घडामोडींमुळे मान्सून केरळमध्येही नेहमीपेक्षा पाच ते सहा दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र केरळसाठी नेमकी तारीख हवामान विभागाने अद्याप जाहीर केलेली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा