Mumbai cha Raja 2025 : यंदा मुंबईच्या राजाच्या मुकुटावरील 'हा' पोपट काहीतरी खास सांगतोय... काय आहे, जाणून घ्या...  Mumbai cha Raja 2025 : यंदा मुंबईच्या राजाच्या मुकुटावरील 'हा' पोपट काहीतरी खास सांगतोय... काय आहे, जाणून घ्या...
ताज्या बातम्या

Mumbai cha Raja 2025 : यंदा मुंबईच्या राजाच्या मुकुटावरील 'हा' पोपट काहीतरी खास सांगतोय... काय आहे, जाणून घ्या...

मुंबईचा राजा 2025: 'शुक' पोपटाच्या खास संदेशाची कथा जाणून घ्या, प्रभू राम आणि सीतेच्या प्रेमाचे प्रतीक.

Published by : Riddhi Vanne

Ganesh Chaturthi 2025 : यंदा मुंबईच्या राजाच्या मुकुटावर दिसणारा 'शुक' पोपट हा केवळ पक्षी नसून तो प्रभू श्रीराम आणि सीता यांच्यामधिल प्रेम, विश्वास आणि आशेचे प्रतीक आहे. संकटाच्या काळातही आशेचा किरण येतो, हे त्याचे स्थान आठवण करून देते.

शुक

प्रभू श्रीरामांचा प्रिय दूत

श्रीरामांचा प्रिय दूत आणि सीतेचा सखा, 'शुक' पोपटाची ही अद्भुत कथा, एका पक्षाच्या नजरेतून उलगडणारी भक्तीची गाथा.

रामेश्वरमच्या समुद्रकिनारी प्रभू श्रीराम उभे होते. समोर अथांग समुद्र, आणि मनात केवळ एकच वेदना "माझी सीता लंकेत कैदेत आहे, तिच्यापर्यंत मी संदेश कसा पोहोचवू?" त्या क्षणी प्रभू खूप व्याकुळ झाले होते. अचानक एक सुंदर हिरवा पोपट त्यांच्या खांद्यावर येऊन बसला. तो गोड आवाजात रामनाम जपू लागला प्रभूना आश्चर्यही बाटले आणि मायेची ओलही. हा लहानसा पक्षी इतका निडर आणि निरागस होता.

प्रभू रामांनी विचार केला "हा छोटा जीवच माझा दूत होऊ शकतो." त्यांनी पोपटाला सांगितले की, "लंकेत माझी सीता दुखात आहे, तिच्यापर्यंत माझा संदेश पोहोचव." आता त्या लहानशा पोपटाच्या पंखांवर प्रभूची मोठी जबाबदारी होती. लंकेत अशोक वाटिकेत सीता बसल्या होत्या. चेहन्यावर दुख, डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. आजूबाजूला राक्षसी पहारा देत होत्या. त्याच वेळी फांदीवरून पोपट खाली उत्तरला आणि गोड आवाजात रामनाम गुंजवू लागला.

शुकाने सीतेला सांगितले "राम तुला विसरलेले नाहीत. ते तुला सोडवायला लवकरच येतील. धीर धर." हा संदेश ऐकताच सीतेच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. निराश हृदयात पुन्हा आशा जागली. आपलं काम पूर्ण करून शुक परत रामाकडे गेला. त्याने फक्त संदेशच पोहोचवला नाही, तर सीतेच्या मनात आशेचा दिवा पेटवला. तो दूत म्हणून गेला होता, पण परतताना प्रभूचा अतिप्रिय सखा झाला.

टीप- वरील दिलेली बातमी मुंबईच्या राज्याच्या अधिकृत पेजवरील आहे...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा