थोडक्यात
उद्धव ठाकरेंनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली
नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर देशभक्तीचा व्यापार चालवण्याचा आरोप केला.
नीरज चोप्रा प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी अंधभक्तांवर निशाणा साधला
उद्धव ठाकरे यांनी शेवटी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही थेट प्रश्न विचारले. “तुम्ही देशाला सांगणार का की युद्ध थांबले आहे? आणि जेव्हा तुमच्याच समर्थकांनी नीरज चोप्रा व महिला लष्करी अधिकाऱ्यांवर घाणेरडे आरोप केले होते, त्यांना आता काय उत्तर द्याल?” असा सवाल करत ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर देशभक्तीचा व्यापार चालवण्याचा आरोप केला. पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा असल्याचे ते म्हणाले.
नीरज चोप्रा प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी अंधभक्तांवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “जेव्हा नीरज चोप्राने पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम याला भारतात खेळायला बोलावले, तेव्हा त्याला देशद्रोही म्हटले गेले. पण आता तेच लोक शांत आहेत. युद्ध केलेल्या पाकिस्तानशी सामना खेळणे योग्य कसे ठरते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना नेत्यांनी यावेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची झालेली भेटही आठवली. त्यांनी सांगितले की, “बाळासाहेबांनी त्यावेळी मियाँदादला स्पष्ट सांगितले होते की पाकिस्तानाने आपली भूमिका बदलल्याशिवाय क्रिकेट होणार नाही. पण आज व्यापाराच्या गणितात देशभक्ती आणि हिंदुत्व विसरले जात आहे.”
उद्धव ठाकरे यांनी शेवटी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही थेट प्रश्न विचारले. “तुम्ही देशाला सांगणार का की युद्ध थांबले आहे? आणि जेव्हा तुमच्याच समर्थकांनी नीरज चोप्रा व महिला लष्करी अधिकाऱ्यांवर घाणेरडे आरोप केले होते, त्यांना आता काय उत्तर द्याल?” असा सवाल करत ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.