Narendra Modi Team Lokshahi
ताज्या बातम्या

ज्यांनी आमच्यावर 250 वर्षे राज्य केले,त्यांना आम्ही मागे सोडले- पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश घडविण्याचे काम सध्याच्या शिक्षकांच्या हाती

Published by : Sagar Pradhan

आज सर्व देशात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी यशस्वी शिक्षक होण्याचे गुणही सांगितले. सोबतच जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

शिक्षक या नात्याने वर्गातच नव्हे तर विद्यार्थ्यांशी घरीही संपर्क केला पाहिजे

पंतप्रधान म्हणाले की, शिक्षकाचे काम केवळ शिकवणे शाळेचे काम करणं असे नाही. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे काम आहे. त्यांचे विद्यार्थ्यांचे जीवन सुधारणे आणि त्यांना चांगले नागरिक बनवणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील दुविधा दूर करण्याचे काम शिक्षक उत्तम पद्धतीने करू शकतात, शिक्षक या नात्याने आपण विद्यार्थ्यांशी केवळ वर्गातच नव्हे तर त्यांच्या घरीही संपर्क केला पाहिजे.

देश घडविण्याचे काम सध्याच्या शिक्षकांच्या हाती

यावेळी त्यांनी तरुण मनांना योग्य आकार आणि दिशा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले.आमचे सध्याचे राष्ट्रपती देखील शिक्षक आहेत, हे आमचे भाग्य आहे. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य शिक्षक म्हणून गेले. देश घडविण्याचे काम सध्याच्या शिक्षकांच्या हाती आहे, असे मोदी म्हणाले.

आमच्यावर 250 वर्षे राज्य, केले त्यांना आम्ही मागे सोडले

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, भारत ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. हे स्थान मिळवणे विशेष आहे, कारण ज्यांनी आमच्यावर 250 वर्षे राज्य, केले त्यांना आम्ही मागे सोडले आहे. असे बोलत पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील तरतुदी, न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदळाची पेज; जाणून घ्या फायदे

Sanjay Raut On IND-PAK Match : पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं' भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचा संताप

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा