ताज्या बातम्या

पुणे इंडिगो एअरलाइनच्या 20 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे इंडिगो एअरलाइनच्या 20 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुणे इंडिगो एअरलाइनच्या 20 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ई-मेलवरून अज्ञाताने ही धमकी दिली आहे. सलग दुसऱ्या दिवशी एअरपोर्टवरील विमानांना उडवून देण्याची धमकी दिली गेली आहे.

काल 85 विमानांना धमकी दिल्यानंतर आज पुन्हा 20 विमानांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून इंडिगो कंपनीच्या सह इतर कंपन्यांना धमकी मिळत असताना हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्याचं 600 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

प्रवासी विमानांना धमकी येण्याची सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विमानतळ हाय अलर्टवर असून विमान उडवून देण्याच्या धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा