थोडक्यात
अंजली दमानिया यांना धमकीचा फोन
'धनंजय मुंडे-वाल्मिक कराडबद्दल बोलू नये'
फोन करत अज्ञाताकडून अंजली दमानिया यांना धमकी
अंजली दमानिया यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. कॉल करत धमकी आल्याची अंजली दमानिया यांनी माहिती दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, ह्या फोन वरून कॉल आला व मला जवळजवळ धमकी दिली गेली.
“ आमच्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर नका बोलू” असे सांगण्यात आले. फोन कट करुन हे ट्वीट केले. असे त्यांनी सांगितले आहे.