कोंढवा हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. काल दुपारी म्हणजेच 1 नोव्हेंबरला गणेश काळे याची हत्या केली होती, याचपार्श्वभूमिवर तीन आरोपींना कोंढवा पोलिसांनो आज कोर्टात हजर केल होत. ज्यात अमन शेख,अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे या तिघांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतल आहे. यात पिस्तूल आणि शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार काल झालेल्या हत्येत थेट आंदेकर टोळीचा संबंध लावण्यात येत आहे. तसेच कोंढवा परिसरात काल जी घटना घडली होती यात मयत व्यक्तीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून या गुन्ह्यात 9 आरोपी निष्पन्न झाले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व आरोपींचा गुन्ह्यात काय रोल होत याचा शोध सुरू आहे. तर बंडू अंदेकर याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सर्व आरोपींची चौकशी सुरू असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार नेमके कुठून आणले याचा देखील शोध सुरू आहे. या प्रकरणातील मयत गणेश काळे याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.